(नवी दिल्ली)
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (DRDO) मानव विरहीत विमान विकसित करण्यात यश मिळाले आहे. डीआरडीओने या ‘ऑटोनोमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर’चे पहिले उड्डाण यशस्वी केले आहे. भविष्यात हे उड्डाण मानवरहित स्टेल्थ विमान म्हणजेच स्टेल्थ यूएव्ही विकसित करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल मानले जात आहे. डीआरडीओनं कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी श्रेणीतून स्वायत्त फ्लाइंग विंग तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे पहिले उड्डाण यशस्वीरित्या केले.
स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरचे हे उड्डाण भविष्यातील मानवरहित विमानांच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे. अशा धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याचा स्वदेशी स्टेल्थ आटॅक- ड्रोन बनवण्याशीही संबंध जोडला जात आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे अशी यूएव्ही शत्रूच्या रडारलाही चकवा देण्यास सक्षम आहेत.
आत्मनिर्भर भारताचा मार्ग मोकळा मानवरहित हवाई विमान डीआरडीओ, बंगळुरुच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) प्रयोगशाळेने डिझाइन आणि विकसित केले आहे. हे लहान टर्बोफॅन इंजिनद्वारे समर्थित आहे. विमानासाठी वापरण्यात येणारी एअरफ्रेम, अंडरकॅरेज आणि संपूर्ण उड्डाण नियंत्रण आणि एव्ही ओनिक्स प्रणाली स्वदेशी विकसित करण्यात आली होती. दरम्यान, मानव विरहीत विमानाचे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh) यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. स्वायत्त विमानांसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. गंभीर लष्करी यंत्रणेच्या दृष्टीने आत्मनिर्भर भारताचा मार्ग मोकळा करेल असेही राजनाथ सिंह म्हणाले.