(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील धामणी गोकुळनगरी येथील शाहीर भिकाजी चोगले यांना कला क्षेत्रातील लोकगौरव पुरस्कार मुंबई येथे नुकताच प्राप्त झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव, माजी आमदार विनय नातू यांच्या हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात आला. चोगले बुवा यांचा हा सन्मान हा सर्व लोककलाकारांचा सन्मान ठरला आहे.
यावेळी कार्यक्रमात चोगले बुवांना लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करताना वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव, माजी आमदार विनय नातू , इतर मान्यवर उपस्थित होते.