भारतीय मसाल्यांना पूर्वीपासूनच जगभरात मागणी राहिलेली आहे. त्यातील औषधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरले आहेत. काही मसाले तर पदार्थाची चव वाढवण्यासाठी नव्हे वा लज्जतदार जेवण तयार होण्यासाठीच नव्हे, तर आरोग्याला फायदे म्हणूनही खाल्ले पाहिजेत. भारतीय मसाल्यामध्ये लवंगांना विशेष महत्त्व आहे. कोरोना संक्रमण काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लवंगेचा खूप उपयोग होऊ शकतो.
भारतीय आयुर्वेदात लवंगेचा वापर औषध म्हणून केला गेला आहे. शास्त्रज्ञांनीही लवंगेच्या उपयोगी गुणधर्मांवर संशोधन केलं आहे. खोकला, सर्दीपासून पोटदुखीवरच्या उपचारात लवंग रामबाण उपाय म्हणून वापरतात. आकाराने छोटी असणाऱ्या या लवंगेचा वापर ‘पार्किन्सन’सारख्या मोठ्या आजारांपासून बचाव करण्यासाठीही केला जातो.
1. लवंगेत आढळणारे गुणधर्म –
व्हिटॅमिन- ई, व्हिटॅमिन- सी, फॉलीक ऍसिड, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन- ए, थायमिन, व्हिटॅमिन- डी, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् असे फायदेशीर घटक आहेत. शिवाय अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत.
2. लवंग खाण्याचे फायदे –
रात्रीच्या जेवणानंतर दररोज झोपण्याआधी दोन लवंगा चघळाव्यात. सोबत गरम पाणी पिल्यास लवंगांचा चांगला फायदा होता. शरीरातील काही आजार हळूहळू कमी होऊन पूर्ण संपतात.
रात्री कोमट पाण्यासोबत लवंग घेतल्यास बद्धकोष्ठता, अतिसार, अॅसिडीटीची समस्या दूर होते. लवंगांमध्ये अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-ऑक्सिडंट हे गुणधर्म आहेत, त्यामुळे मुरुमांचा त्रास दूर होतो.
दात दुखत असतील तर लवंग रात्री कोमट पाण्याबरोबर खा. त्यामुळे दात दुखीत आराम मिळेल आणि इन्फेक्शन कमी होईल.
घशाची खवखव, वेदना किंवा खोकला झाला असेल, तर रात्रीच्या वेळी लवंग खावी. आराम मिळेल.
हातपाय कापत असतील तर, रात्रीच्या जेवणानंतर लवंग खा आणि गरम पाणी प्या. असे दररोज केल्याने हळूहळू आराम मिळेल.
रात्री लवंगेचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्तीत वेगाने वाढ होतो. व्हायरल इन्फेक्शन, ब्राँकायटिस, सायनस आणि दम्यामध्ये आराम देते.
लवंग हाडे मजबूत आणि निरोगी ठेवते. रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रित करते.
रात्री लवंग खाल्याने स्ट्रेस कमी होतो. लिव्हरचे कार्य सुरळीत राहते.