(रत्नागिरी)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे सन 2022-23 वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. मागासवर्गीय गरजू विद्यार्थी, विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतिगृहातील गृहपाल, अधिक्षिका व सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी (02352-230957) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एस.एस.चिकणे, सहायक आयुक्त समाजकल्याण, रत्नागिरी यांनी केले आहे.