( रत्नागिरी / प्रतिनिधी )
राजिवडा-भाट्ये पुलावरून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने युवकाने खाडीत उडी मारली. त्यावेळी पुलाखाली मासे गरवत असलेले राजिवडा गावातील श्री. आसिफ मिरकर यांनी प्रसंगावधान राखून पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहत बुडणाऱ्या युवकाला स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले आहे. हा युवक हा रत्नागिरी परिसरातील असल्याचं बोलले जात आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
भाट्ये पुलावरून अनेकवेळा खाडीत उड्या मारून आत्महत्येचा प्रयत्न करीत असतात. त्यातील 99% व्यक्तीना राजिवडा परिसरातील मच्छीमारांनी वाचविले आहे.