रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना टेस्टींग वाढल्याने सद्य स्थितीत असणाऱ्या एकमेव आरटीपीसीआर लॅबवर प्रचंड ताण पडत होता. यामुळे स्वाब टेस्ट साठी पाच ते सहा दिवस लागत होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी हि बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब उपलब्ध करून दिली आहे.