( रत्नागिरी / प्रतिनिधी )
कोल्हापुरला कत्तलीसाठी गुरांना घेऊन जाणारा टेम्पो मुंबई – गोवा महामार्गावरील निवळी येथे पोलिसांनी पकडला. यामध्ये 5 जनावरे आढळून आली असून गाडीसह एकूण 4 लाख 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. हंसराज विलास चांदणे ( 29 , मलकापूर , ता . शाहूवाडी , जि . कोल्हापूर ) आणि रामचंद्र साधु सोने ( 40 , आरुळ , शाहूवाडी , कोल्हापूर ) अशी दोन संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूरच्या दिशेने गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर गस्त घालत असताना निवळी येथील ग्रीन पार्क हॉटेल समोरील वळणार महिंद्रा पिकअपमधून गुरे वाहतूक करताना दिसून आला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्यावर संशय आल्याने गाडीची झाडाझडती घेतली. यावेळी गाडीत दाटीवाटीने कोंबून भरलेली 5 गुरे दिसून आली. पोलिसांनी त्याला चौकशी ताब्यात घेतले असता. गुरे कोल्हापूर येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने कबूल केले. जनावरे व महिंद्रा गाडी असा एकूण 4 लाख 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सागर कदम ( वय 31 , रा . कदमवाडी , हातखंबा , रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 23 जुन पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.