(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावाचा सुपुत्र कु. चेतन नितीन पंदेरे याने यु.पी.एस.सी. परिक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तर्फे सत्कार करण्यात आला.
नुकतेच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. रत्नागिरी पोलीस खात्यात सहाय्य्क पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. नितीन सिताराम पंदेरे यांचे सुपुत्र चि. चेतन पंदेरे आयपीएस अधिकारी झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सारख्या खेडेगावातून पुढे येऊन शिक्षण घेतलेल्या चेतन पंदेरे याने युपीएसी परीक्षेत ४१६ वी रँक घेत बाजी मारली आहे . युपीएससीमधून तो आयपीएस अधिकारी झाले असून, त्याच्या या यशाचे विशेष कौतुक करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा. नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी उपस्थितीत मनसे खेड तालुकाध्यक्ष दिनेश उर्फ नाना चाळके, चिपळूण मा. तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे, ऋषिकेश कानडे, मनविसे मा.जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, सांस्कृतिक सेनेचे तालुकाध्यक्ष विनय माळी, राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर, संचालक सुरेश खेडेकर, खेड शाखा अधिकारी स्वप्नील नरळकर, सौ. पंदेरे, विनय शिरगांवकर, राजवैभव प्रतिष्ठान चे मिलींद उर्फ दादु नांदगांवकर, जयेश गुहागरकर, प्रदिप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.