(ठाणे/उदय दणदणे)
पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीस आळा घालण्याचे दृष्टिने पोलीस आयुक्त श्री.अंकुश शिंदे यांनी दिलेल्या सुचनेस अनुसरून गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस पथकाने आरोपींचा माग काढुन चाकण चौक येथे सापळा लावुन थांबले असता एका मोटार सायकलीवरून तीन इसम संशयीतरित्या खेड कडून येत असताना दिसुन आले.
पोलीसांना पाहून ते पळुन जात असताना पो ना. १४१७ सचिन मोरे व पो.शि. १७ ९ १ प्रमोद गर्जे यांनी त्यांचा एक कि.मी. पाठलाग करुन शिताफ़िने पकडले. त्यांना नाव पत्ता विचारता, त्यांनी त्यांची नावे १) प्रज्वल प्रताप देशमुख, वय २० वर्षे, रा. वरवटे मळा जवळेकडलग, ता. संगमनेर, जि. अहमदनगर २)अक्षय लहानु जाधव, वय २७ वर्षे, रा.न्यु तांबे हॉस्पीटल समोर, बटवाल मळा, संगमनेर ता. संगमनेर, जि. अहमदनगर असे सांगितली. त्याचेकडे चौकशी केली ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना युनिट १ कार्यालयात आणुन सखोल चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली मोटार सायकल ही त्यांनी म्हाळुंगे, चाकण परीसरातून चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांना चाकण पोलीस स्टेशन कडील गु.रजि. नं . ७६८/२०२२ भादवि कलम ३७९ या वाहन चोरीचे गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली .
आरोपी यांची पोलीस कस्टडी घेवुन तपास करता त्यांनी त्यांचा संगमनेर येथील साथीदार तुषार फटांगरे,रा.संगमनेर, जि. अहमदनगर व एक अल्पवयीन साथीदारासह पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामी , नाशिक या परीसरातुन मोटार सायकली चोरी करून त्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, पाथर्डी, अकोले येथे त्यांचे ओळखीचे लोंकाना विक्री केल्याचे सखोल तपासामध्ये उघड झाले. त्यानुसार त्यांचा साथीदार तुषार भारत फटांगरे, वय २१ वर्षे, रा.मु.पो.पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यास संगमनेर परीसरातून ताब्यात घेवुन त्यासही दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे .
पोलीस कोठडी दरम्यान आरोपी हे संगमनेर येथे मोटार सायकली वरून पुणे नाशिक रोडवरील चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, आळेफ़ाटा व नाशिक परीसरात येऊन मोटार सायकल चोरी करून रातोरात परत जात असे व चोरीलेल्या मोटार सायकली हया परीचीत लोकांना कागदपत्र नंतर देतो असे आश्वासन देऊन विकत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे .
आरोपीकडुन त्यांनी त्यांचे ओळखिच्या लोकांना विकलेल्या एकुण ९ लाख ४५ हजार रूपयांच्या १७ मोटार सायकली हस्तगतकरण्यात आल्या असुन त्यांचे अनेक ठिकाणी गुन्हे उघडकीस आले आहेत. चाकण पो.स्टे., नारायणगाव पो.स्टे. पुणे ग्रामीण, खेड पो.स्टे. पुणे ग्रामीण, आळेफाटा पो.स्टे. पुणे ग्रामीण, लोणी पो.स्टे, जि.अहमदनगर, भद्रकाली पो.स्टे . नाशिक शहर, नाशिक रोड पो.स्टे. नाशिक शहर, मुंबई नाका पो.स्टे.नाशिक शहर, अशा विविध ठिकाणी त्यांच्या विरुद्ध भादवि कलम ३७९ अन्वे गुन्हे दाखल आहेत.
अटक आरोपी अक्षय लहानु जाधव हा संगमनेर ग्रामीण पोलीसांचे रेकॉर्डवरील असुन त्याचे विरूध्द वाहन चोरी व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर तसेच पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे, सचिन मोरे, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडीक, सोमनाथ बोन्हऱ्हाडे, महादेव जावळे, जावेद पठाण, विशाल भोईर, बाळु कोकाटे, मनोजकुमार कमले, उमाकांत सरवदे, मारुती जायभाये, अजित रूपनवर, प्रमोद हिरळकार, स्वप्निल महाले यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे .