(देवरूख/सुरेश सप्रे)
राजकीय दबावाला बळी न पडता श्रीकृष्णा सारखी दुरदृष्टी ठेवून सत्याची कास धरावी धरत प्रामाणिकपणे काम करून पोलिस खात्यात आपला ठसा उमटवला पाहिजे, तसेच सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन देवरू़ख प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी केले. ते युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या चेतन पंदेरे याच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
चेतन नितिन पंदेरे याचा तालुका महाराष्ट्रीय यादव (गवळी) संगमेश्वर समाजाच्यावतीने देवरूख माटे-भोजने-खेतले सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चेतनचा सत्कार चंद्रकांत भोजने व अविनाश कांबळे यांचे हस्ते करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्रीय यादव ट्रस्टचे चंद्रकांत भोजने, अविनाश कांबळे, देवरू़ख प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर, चेतन व त्याचे आई वडील, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, आरडीसीसी बँकेच्या संचालिका सौ. नेहा माने, माने काँलजचे प्राचार्य महेश भागवत, सोसायटी चेअरमन संतोष लाड, बबन बांडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.