(खेड/ प्रतिनिधी)
तालुक्यातील साखरोली येथे रस्त्याच्या विरुध्द दिशेला जावून एसटी बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने तीनजण जखमी झाल्याची घटना 9 जून रोजी 4.30 वा. च्या सुमारास घडली. वसंत चंदे (50), फरजाना देसाई (49, डाकबंगला, खेड), शबिना अल्ताफ बिजले (40, खेड) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद रिक्षा चालक वसंत नारायण चंदे (50, रा. शिवाजी चौक, खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदे हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेवून साखरोली गावी चढावाच्या दिशेने जात होते. यावेळी वरुन येणार्या एस. टी. बस ने विरुध्द दिशेला येवून रिक्षाला उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेजण जखमी झाले.
संजय अर्जुन कुंभारकर (46, मिरज, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालक वसंत चंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एसटी बस चालक संजय अर्जुन कुंभारकर (46, मिरज, सांगली) याच्यावर भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.