(जाकादेवी/ वार्ताहर)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ६ जून रत्नागिरी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे आणि विस्तार अधिकारी सशाली मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते शामराव पेजे सभागृहात तालुक्यातील शिक्षकांनी पथनाट्याचे यशस्वीपणे लक्षवेधी सादरीकरण केले. यात पानवल होरंबेवाडी शाळेतील शालेय विद्यार्थी, मुख्या. सौ.मानसी पावसकर आणि रत्नागिरी तालुक्यातील शिक्षिकांनी अतिशय सक्रिय सहभाग दर्शवून आपली कला प्रदर्शित केली.
साहित्यप्रेमी आणि उपक्रमशील शिक्षिका श्रीम.अनुप्रिता कोकजे यांनी या पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले. यामध्ये मानसी कुबडे, सुजाता कदम, विभा बाणे, मानसी तावडे,अपूर्वा पवार आणि अनुप्रिता कोकजे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
पथनाट्य सादरीकरणासाठी मार्गदर्शन व प्रेरणा दिल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्रीम.शिंदे व विस्तार अधिकारी सौ. मोहिते यांना अनुप्रिता कोकजे यांनी मनापासून धन्यवाद दिले. या संपूर्ण कार्यक्रमाला गटविकास अधिकारी श्री.जाधव यांचे व पंचायत समिती रत्नागिरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.