(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दुचाकीवरुन जात असताना चक्कर येवून पडल्याने उपचारादरम्यान वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना जयगड येथे घडली. अंकिता अविनाश नेवरेकर (50, वरवडे, केसपुरीवाडा, जयगड, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. याबाबची फिर्याद पती अविनाश नेवरेकर यांनी जयगड पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीत काम असल्यामुळे अंकिता या केसपुरी स्टॉप जयगड ते रत्नागिरी अशा एका इसमाच्या दुचाकीवरुन जात असताना वरवडे येथे आल्यावर दुचाकीवर चक्कर येवून त्या खाली कोसळल्या. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी खंडाळा येथे दाखल केले. त्यानंतर रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासाअंती मृत घोषित केले.