(रत्नागिरी)
सद्यस्थितीत नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांचे अधिकार अस्तित्वात नाहीत. मात्र आता शाळा, काॅलेज प्रवेशासाठी तसंच अन्य दाखले प्राप्त करण्यासाठी काही कागदपत्रांच्या सत्यप्रती आवश्यक असतात. स्थानिक लोकप्रतिनिधींचे अधिकार अस्तित्वात नसल्याने तसेच विविध अधिकारी सत्यप्रती करुन देण्यासाठी ते कामाच्या व्यस्ततेमुळे तयार नसतात. यामुळे सत्यप्रतित कागद दाखल करणे अवघड होणार आहे. अशा स्थितीत दाखले व अन्य कागदपत्रे प्राप्त करणे दुरापास्त होणार आहे. ही अडचण लक्षात घेऊन सत्यप्रतीचा आग्रह न धरता स्वसाक्षांकित ग्राह्य धरण्यात यावे.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयातून दाखले प्राप्त करताना येणारी मोठी अडचण आपल्या निदर्शनात आणून देत आहे. तरी नागरिकांची अडचण लक्षात घेऊन स्वसाक्षांकित कागदपत्र दाखल्यांसाठी ग्राह्य धरण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी भाजपा द.रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी डाॅ.बी.एन.पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.