(रत्नागिरी/प्रतिनीधी)
एप्रिल व मे 2022 या महिन्यातील थकित वेतन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून 6 जून 2022 रोजी आयुक्त कार्यालय येथे दु. 2 वाजता थाळीनाद मोर्चा धडकणार आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
राज्यात सुमारे 2 लाख अंगणवाडी महिला कर्मचारी काम करत आहेत. शासनाकडून अंगणवाडी सेविकांना 8325/- व मिनी अंगणवाडी सेविकांना रू. 5975/- व मदतनिसांना रू. 4425/ असे अल्प मानधन दिले जाते. मात्र ही रक्कम कधीही वेळेवर दिली जात नाही. एप्रिल 2022 या महिन्याच्या मानधनाची रक्कम आजपर्यंत देण्यात आलेली नाही. यामुळे राज्यभरातील अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे.
या दोन महिन्याचे थकीत मानधन त्वरीत देण्यात यावे व अंगणवाडी कर्मचार्यांच्या इतर सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी 20 जून ते 25 जून 2022 पर्यंत शेकडो अंगणवाडी कर्मचारी यवतमाळ ते अमरावती कार्यालयावर पदयात्रा काढून मागणी मान्य करावी याचा आग्रह धरणार आहेत.