(स्पोर्ट्स/अहमदाबाद)
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात काल रविवारी 29 मे रोजी फायनलचा सामना रंगला. फायनलचा सामना एकतर्फी झाल्याने मोदी स्टेडियमवर आलेल्या लाखो प्रेक्षकांचा हिरमोड झाला.
हार्दिक पंड्याच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानला गुजरातपुढे विजयासाठी १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. पण गुजरातने या आव्हानाचा सात विकेट्स राखत यशस्वी पाठलाग केला आणि हार्दिक पांड्याच्या संघाने पदार्पणातच आयपीएल 2022 चषकावर गुजरात टायटन्सचे नाव कोरले.
जोस बटलरचा ऑरेंज कॅपने सन्मानित करण्यात आलं तर यजुवेंद्र चहलला पर्पल कॅप देऊन सन्मानित करण्यात आलं. उमरान मलिक ठरला हंगामातील उदयोन्मुख खेळाडू. पंड्या ठरला सामनावीर.