(खेड)
खवटी-बौद्धवाडी येथे जुन्या वादातून एकास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास घडली. याबाबत सुरेश पांडुरंग धोत्रे यांनी पोलीस स्थानकात तकार दाखल केली.
नितेश नागेश मोहिते, हिराचंद लक्ष्मण धोत्रे (दोघेही खवटी-बौद्धवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी संगनमताने सुरेश धोत्रे यांच्या घरात अनधिकृतपणे घुसून जुन्या वादातून त्यांना शिविगाळ करत दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.