(चिपळूण)
ज्ञानदीप महाविद्यालयातील तृतीय वर्षात कॉम्प्युटर सायन्स शिकत असलेली कु. आदिती तानाजीराव शिंदे हिची बेस्ट गर्ल्स ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्याच्या पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण राज्यमंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते भव्य असा चषक देऊन सत्कार करण्यात आला.
या सन्मानाच्या निवड प्रक्रियेसाठी विद्यार्थ्याची कॉलेज बद्दलची आत्मीयता, कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी वागणूक, कॉलेज मधील विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांतील सहभाग याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता असे विविध निष्कर्ष ठेवण्यात आले होते. कुमारी आदिती हिने सर्वच स्तरावर अव्वल कामगिरी बजावल्याने ती पुरस्कारासाठी पात्र ठरली. तिच्या या कामगिरीसाठी डॉ. उमेश कुमार बागल, सौ. हेमलता इंगवले, श्री. महेश बंडगर, कु. धनश्री आंब्रे, कु. ऐश्वर्या कापडी या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री. अरविंद तोडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, मा. आमदार श्री.संजय कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. शंकर कांगणे, संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे अध्यक्ष दीपक, प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी, उपप्राचार्य उमेश कुमार बागल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्याने तिच्या या कामगिरीचे कौतुक करत तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने राज्यमंत्री नामदार आदिती तटकरे यांनी आदिती तानाजीराव शिंदे हीच्या अव्वल कामगिरीला सन्मानाचे पंख मिळाले असल्याचे बोलून दाखवले.