(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने जयगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली गणपतीपुळे येथील सागर रक्षक दल व पोलीस मित्रांना ओळखपत्राचे वितरण करण्याचा कार्यक्रम नुकताच गणपतीपुळे येथील चिंतामणी मंगल कार्यालयात कार्यालयात घेण्यात आला. यावेळी गणपतीपुळे येथील सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कार्यरत असणाऱ्या कार्यरत असलेल्या सागर रक्षक दल व पोलिस मित्रांना ओळखपत्रांचे वाटप जयगड चे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यात विशेष मोलाची कामगिरी करणाऱ्या गणपतीपुळे येथील मोरया वॉटर स्पोर्टच्या सदस्यांचा सन्मान जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला जयगड व गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस दूरदूरक्षेत्राचे पोलीस हवालदार राहुल जाधव व पोलीस अंमलदार मधुकर सरगर यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी गणपतीपुळे व मालगुंड येथील हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सध्याच्या उन्हाळी हंगामात पर्यटकांची होणारी गर्दी व त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूकीची समस्या सोडवण्याबाबत सहकार्य करण्याबाबत आवाहन केले गेले. त्यानंतर योग्य त्या सूचना संबंधित सर्व हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आल्या.