(रत्नागिरी)
टिडब्ल्यूजे – द सोशल रिफॉर्म्स आणि टिडब्ल्यूजे इव्हेंट्स तर्फे आयोजित “द टॉकिंग फ्रेम्स” आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ दिनांक २० मे रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभी आर्ट डिरेक्टर निखिल कोवळे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, संतोष पाठारे उपस्थित होते. याच कार्यक्रमावेळेस कला आरंभ ह्या आर्ट प्रदर्शनाचेही उद्घाटन झाले.
सदरील कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग ह्यांनी आवर्जून भेट दिली चित्रकारांचे कौतुक केले. ३ दिवस चालणाऱ्या ह्या फेस्टिवलच्या उदघाटन प्रसंगी फेस्टिवल डायरेक्टर प्रसन्न करंदीकर ह्यांनी प्रस्तावना केली, फेस्टीवल क्युरेटर संतोष पाठारे यांनी अश्या प्रकारच्या चित्रपट महोत्सव होण्या मागील महत्त्व समजावू दिलं व उपस्थित मान्यवरांनी प्रेक्षकांना मार्गदर्शन केले.
या महोत्सवाची सुरुवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘guilty’ ह्या डेन्मार्क च्या चित्रपटाने झाली.
आजचे चित्रपट: शनिवार २१ मे २०२२
*सकाळी साडे ९ वाजता सितीप्राईड, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे ‘ ला मिजरेबल ‘ हा फ्रेंच चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
*दुपारी १ ते ४ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयात लघुपट स्पर्धेतील ११ लघुपट दाखवण्यात येतील.
*४ ते ४.३० थप्पड, ती सध्या काय करते, व्हेंटिलेटर, फास्टर फेणे या चित्रपटांचे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक निखिल कोवळे चित्रपटातील कला दिग्दर्शन या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
*४.३० ते ६.३० – डॉ. संतोष पाठारे दिग्दर्शित ‘ सुमित्रा भावे – एक समांतर प्रवास ‘ हा माहितीपट प्रदर्शित होईल
*सायंकाळी ७ ते ८.३० – ‘ आंदाल ‘ हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित होईल.