(रत्नागिरी)
रत्नागिरी येथे मंगळवार दिनांक २४ मे रोजी ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कुणबी, भंडारी, मुस्लिम, तेली, खारवी, शिंपी, गाबीत, पांचाळ सुतार, कासार, धनगर, गाबीत, नाभिक अश्या ओबीसी जातींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी या बहुजन परिषदेमध्ये संवाद साधला जणार आहे. ओबीसी व्हिजेएनटी परीषदेचे प्रमुख वक्ते अरुण खरमते आणि कल्याण दळे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी नेते नविनचंद्र बांदिवडेकर ओबीसींच्या समस्या आणि तक्रारी या बैठकीच्या माध्यमातुन सरकारकडे पोचविणार आहेत.
मंगळवार दिनाक २४ मे २०२२ रोजी ४:०० वाजता शहरातील व्यंकटेश एक्झ्युकिटिव्ह, मारुती मंदीर येथे आयोजीत केलेल्या या बैठकीला सर्व बहुजन समाजांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन युवा प्रतिनिधी केतन पिलणकर यांनी केले आहे