मुंबई
जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने सुवर्णपदकाची कमाई केल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. निखतने अंतिम सामन्यात थायलंडच्या जितमास जितपाँगला धूळ चारत या सामन्यात निर्विवाद वर्चस्व राखले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
निखतने अंतिम फेरीच्या सामन्यात जितमासचा ५-० असा धुव्वा उडवला. मेरी कोम, सरीता देवी, जेनी आर. एल. आणि लेखा के.सी. यांच्यानंतर हे सुवर्णपदक जिंकणारी निखत ही भारताची पाचवी महिला खेळाडू ठरली आहे. निखतने यावेळी ५२ किलो वजनी गटामध्ये ब्राझीलच्या कॅरोलिन डी अल्मेडाचा ५-० असा पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. अंतिम फेरीत अव्वल कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.