(चिपळूण)
कोकणात २२जुलै रोजी चिपळूण, महाड मध्ये आलेला मोठ्या प्रमाणात महापूर आला, या वेळी प्रचंड जनजीवन विस्कळीत झाले होते, घरे व व्यापारी वर्ग यांचे मोठी वित्त हानी झाली होती. या वर नियोजन बद्ध काम करण्यात यावे या करिता नाम फौंडेशन मार्फत चिपळूण व महाड शहरात येणाऱ्या पुरा संदर्भात उपाययोजना करून नियोजन करणे साठी काही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नाम चे मल्हार पाटेकर यांचे, नाम चे मुख्य समन्वयक गणेश थोरात यांचे पाठपुरावा तुन चिपळूण मधील शिव नदी गाळ उपसा कामाचा दि ४/०१/२२ रोजी नाम चे संस्थापक नाना पाटेकर यांचे शुभहस्ते कामाचा शुभारंभ झाला.
कापसाळ धरण ते वाशिष्ठी मुख चिपळूण असा ७.३० कि मि चे काम नाम चे ४ पोकलन व १ जे सी बी यंत्रणेने वेगाने सुरू झाला. या कामासाठी शासनाचे जलसंपदा विभाग रत्नागिरी यांचे कडून डिझेल पुरवठा होत आहे. गेली चार महिने अहोरात्र काम सुरू ठेऊन शिव नदी चे काम अंतिम टप्यात आहे. काढलेला गाळाचे प्रशासनाचे नियोजनातुन योग्य त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. अद्याप काही ठिकाणी जागा मालक यांच्या अडचणी मुळे गाळ उचलला गेला नाही, तसेच गाळ टाकणे कामी जागा ही उपलब्ध नाहीत अशा अडचणी वर मात देत नाम चे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १-२ दिवसात काम पूर्ण होईल. या कामा साठी सुरुवाती पासून नाम कडून ४ पोकलन ने आजपर्यंत शिव नदी पात्रातुन अंदाजे २,४४,२४४ घन मिटर गाळ काढण्यात आला असून तसेच वाशिष्ठी नदी उकताड बेटमधून अंदाज ६५,५७० घन मीटर गाळ उपसा झाला आहे.
चिपळूण शिव व वाशिष्ठी नदी कामी नाम चे वतीने तांत्रिक कामाचे नियोजन जलदुत श्री शाहनवाज शाह ,व अभिलाष खरात हे पाहत आहेत. शिववनदी चा गाळ काढताना जैवविविधता पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवनदीचे पात्र हे पूर्वी ७ ते १२ मीटर होते तेथे शासनाच्या मदतीने सीमांकन करुन २५ मीटरचे आसपास करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बुजलेले डोह मोकळे करण्यात आले तसेच ७.३० कि.मी वर १६ ठिकाणी क्रुत्रिम व नैसर्गिक बंधारे करण्यात आले आहेत या मुळे भूगर्भातील जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. जलचर प्राण्यांसाठी अनेक ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नदी पात्र रुंद झालेने नदीची जलवहन क्षमता ही पाच पटीने वाढलेली आहे.
या कामा साठी मोठ्या प्रमाणात गाळ उचलणे कामी डंपर ची आवश्यकता होती, नाम चे आवाहन नुसार चिपळूण चे नागरिक ,संस्था, डॉक्टर असो ,व्यापारी संघटना,लोटे औद्योगिक वसाहत मधून डंपर साठी काही प्रमाणात आर्थिक योगदान मिळाले तसचे TWJ संस्था यांचे मार्फत २ डंपर ची व्यवस्था करण्यात आली,व नाम मार्फत १० डंपर असे एकूण १२ डंपर १६ तास काम असून या कामात चिपळूण वासीयांनी उत्तम प्रतिसाद देऊन नगर परिषद चिपळूण ,ग्लोबल टुरिझम यांचे सहकार्यातून कचरा मुक्त व प्लास्टिक मुक्त शिव नदी करिता जनजागृती रॅली काढून शिव नदी ची साफ़ सफाई करण्यात आली. शिव नदी कामात शासकीय यंत्रणा मध्ये जलसंपदा विभाग, यांत्रिक विभाग यांचा मोठा हातभार मिळाला. चिपळूण नगर परिषद व ग्रामपंचायत कापसाळ यांचे ही सहकार्य मिळत आहे. त्यातून शिव नदी चे काम दोन दिवसात पूर्ण होईल व यंत्रणा परत जाईल असे मानले जात आहे.
नाम चे या वर्षी कोकणात चिपळूण मध्ये शिव नदी बरोबर वाशिष्ठी नदी उकताड बेट कामा साठी ४ पोकलन मशीन ने २ महिन्या पूर्वी काम सुरू केले आहे.आता या ठिकाणी संपूर्ण शासकीय यंत्रणा मार्फत काम होत आहे. या कामास चिपळूणचे नागरिक, नदी किनार्यावरील लगतचे सर्व जमिन मालक, चिपळूण बचाव समिती, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे सो. व नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, तहसिलदार जयराज सुर्यवंशी साहेब, प्रांताधिकारी प्रविण पवार साहेब, जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता विष्णू टोपरे, उपविभागीय अभियंता खोत सो. कार्यकारी अभियंता जगदीश पाटील सो. अधिक्षक अभियंता सॊ वैशाली नारकर मॅडम तसेच तांत्रिकी विभागाचे साळुंखे सो, गायकवाड सो, बागेवाडी सो. यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळाले.
कोकणात महाड मध्ये ही काळ नदी चे १२ कि मि चे गाळ उपसा चे काम नाम चे माध्यमातून सुरू आहे,तसेच रत्नागिरी जिल्हा मध्ये खेड तालुक्यातील चिरणी गावात लोकसहभागातून काम पूर्ण झाले आहे,संगमेश्वर- देवळे, संगमेश्वर साखरपा-कोंडगाव, संगमेश्वर-ओझरे गाव येथे नाम चे माध्यमातून व लोकसहभागातून कामे सुरू आहेत.
चिपळूण व महाड मध्ये पूर नियंत्रण होणे साठी शासकीय यंत्रणा मार्फत योग्य ती उपाययोजना करून नाम चे जलनाम योजनेतुन कामे होत असून, या कामा साठी सर्व शासकीय यंत्रणा चे व जनतेचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे. कोकणातील कामाचे संपूर्ण नियोजन नाम चे कोकण समन्वयक समीर जानवलकर यांचे माध्यमातून होत असून स्थानिक पातळीवर नाम चे प्रतिनिधी रमण डांगे, महेंद्र कासेकर,सौ छाया सकपाळ, दिगंबर सुर्वे,पृथ्वी पवार, संतोष सावंत-देसाई, मंदार चिपळूणकर, व अन्य सर्वांचे यांचे मोठे योगदान मिळत आहे.