(चिपळूण)
जेष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भुषण ति. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दीनिमित्त व जेष्ठ निरूपणकार पदमश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वाढदिवसानिमित्त डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांचेवतीने श्री सदस्यांचे मार्फत चिपळूण येथे १८ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शेकडो श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत १४३ श्री सदस्यांनी स्वयंशिस्तिने रक्तदान केले. याबाबत समाजातील विविध स्तरांतून प्रतिष्ठानचे कौतुक करण्यात येत होते. याप्रसंगी गुहागरचे आमदार भास्कर जाधव, जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, चिपळूण पंचायत समिती उपसभापती प्रताप शिंदे, अपरान्त हॉस्पीटल चे प्रतिनिधी, राजू कांबळे, तानाजी शिंदे लाईफ केअर हॉस्पीटलचे संदेश यादव, मुसा पिरजादे आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरातील परांजपे मोतीवाले हायस्कुल येथे शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी दीपप्रज्वलन डॉ भोसले, डॉ पानकर, डॉ केळस्कर, डॉ पोतदार, डॉ शामल चव्हाण यांच्याहस्ते तर प्रतिमापूजन डॉ सोनवणे, डॉ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते, धन्वंतरी पूजन डॉ कंदळकर, डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमेस पुष्पहार डॉ केळस्कर मॅडम यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी रेडक्रॉस रक्तपेढी व सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढिचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी सन १९४३ सालापासुन प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मुलन व व्यसनमुक्ती याकरीता अध्यात्मिकतेची जोड देवुन श्री समर्थ बैठक सुरू करून लाखो लोकांना निरूपण श्रवणाची गोडी लावुन असंख्य लोकांचे आजवर कल्याण करून प्रत्येक मनष्याला सदगती देण्याचे कार्य केलेले आहे. मात्र पुढे पुढे हे कार्य इतक्यावरच न थांबता अखिल मनुष्याचे हिताकरीता डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ची स्थापना करून सदर प्रतिष्ठानचे वतीने गोरगरीब लोकांना वस्त्रवाटप, गरीब व गरजु विदयार्थ्यांना शालेल्य वस्तु, वहया-पुस्तके, दप्तरे यांचे वाटप, स्मशानशेडची उभारणी व त्याची स्वच्छता , प्रवासी निवारा शेड उभारणी, सार्वजनिक पाणपोई उभारणी, पाणी अडवण्याकरीता बंधारा बांधणे, दरवर्षी संपुर्ण देशस्तरावर स्वच्छता अभियान, तसेच दरवर्षी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे इत्यादी अनेक उपक्रम आजवर डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे वतीने नेहमीच अत्यंत निष्कामतेने कोणतीही अपेक्षा न करता केले जात आहेत. या सर्व उपक्रमांची जाणीव ठेवुन किंबहुना स्वच्छता अभियानाचा उपक्रमाची दखल घेत भारत सरकारमार्फत आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छता दुत म्हणुन देखील नेमणुक झालेली आहे.
या प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध माध्यमातून रक्तदान शिबिरांचे शिस्तबद्ध आयोजन केले जाते.ज्याठिकाणी रक्ताची नितांत आवश्यकता आहे तिथे गरजवंतापर्यंत रक्त पोहचवणे आवश्यक समजून या शिबिराचे आयोजन करण्यात येते.यासाठी डॉ .श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे वतीने डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या प्रेरणेतुन व डॉ. श्री . सचिनदादा धर्माधिकारी यांनी श्री सदस्यांना केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री सदस्य नेहमीच तयार असतात.
लाखो श्री सदस्यांचे श्रद्धास्थान असणारे पदमश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा नुकताच दिनांक १४ मे २०२२ रोजी वाढदिवस झाला. मात्र व्यक्तीगत वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपणही समाजाचे व देशाचे काही देणे लागतो हे देणे देण्याकरीता खारीचा वाटा म्हणुन आपण समाजाकरीता निष्कामतेने समाजसेवेचे कार्य केले पाहीजे अशी शिकवण श्री समर्थ बैठकीचे माध्यमातुन श्री सदस्यांना देवुन त्याच प्रेरणेने चिपळूण शहरामध्ये परांजपे मोतीवाले हायस्कुल येथे १८ मे २०२२ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबीराकरीता गुहागर, चिपळूण, खेड, दापोली तालुक्यातुन शेकडो श्री सदस्य उपस्थित होते.