(खेड/इक्बाल जमादार)
महामार्ग पोलीस केंद्र कशेडी चे हद्दीमध्ये महामार्ग क्रमांक 66 वर खवटी रेल्वेब्रिज जवळ दि. 17 मे रोजी रात्री 03.00 वाजताच्या दरम्याने धामापूर (तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी) ते मुंबईला जाणारी क्वालिस गाडी (क्रमांक MH.04 BN.4193) वरील चालक किशोर वसंत चव्हाण (वय 48 वर्षे, राहणार धामापूर तालुका संगमेश्वर) यांचा गाडीवरील ताबा सुटून त्यांनी आपले ताब्यातील गाडीची रस्त्याचे साईडला उभी असणारी आयशर गाडीला (क्र. MH 08 AP 6996) हिला मागून ठोकर दिल्याने अपघात घडला.
सदर अपघातामध्ये क्वालीस गाडीवरील चालक किशोर वसंत चव्हाण यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले आहे.
तसेच सदर क्वालीस गाडीमधील अन्य प्रवाशांपैकी 1) कुमारी सनम संदीप चव्हाण (वय 12 वर्षे, डोक्याला गंभीर दुखापत), 2) सो हर्षदा किशोर चव्हाण (वय 40 वर्षे, डोक्याला गंभीर दुखापत), 3) श्री संतोष आबाजी चव्हाण (वय 55 वर्ष, डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत), 4) कुमारी रितिका केशव चव्हाण (वय 16 वर्ष, डोक्याला गंभीर दुखापत), 5) कुमार सार्थक किशोर चव्हाण (वय 14 वर्ष, उजव्या हाताला किरकोळ दुखापत), 6) सौ स्मिता संतोष चव्हाण (वय 50 वर्षे, डोक्याला किरकोळ मुकामार), 7) सौ स्नेहा सुरज कर्वे (28 वर्षे, डोक्याला किरकोळ दुखापत) अशा दुखापती आहेत.
सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचार चालू आहेत. सदर अपघाता मधील वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू आहे. सदर अपघातप्रकरणी अधिक तपास PSI यादव, महामार्ग पोलीस केंद्र चिपळूण पदभार म.पो.केंद्र कशेडी यांचेमार्फत सुरु आहे.