नाशिक मध्ये अंगावर शहारा आणणारी घटना घडली आहे. साधं बिबट्याच नाव घेतलं तरी घाम फुटतो पण नाशिकमध्ये एका शेतकऱ्याच्या चिमुकलीने चक्क मांजर समजून बिबट्याच्या बछड्याला घरी आणला आणि सर्वांची घाबरगुंडी उडाली.
मोरझर शिवारातील रावसाहेब गंगाराम ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ आठवडाभरापूर्वी एक मांजरीच्या पिल्लासारखे दिसणारे पिल्लू घरातील लहान मुलांना दिसले. मांजरीपेक्षा वेगळा रंग असल्याने आणि दिसायला गोंडस असल्याने मुलांनी त्याच्यासोबत मैत्री केली. आणि चिमुकलीने त्याला उचलून घरी आणले. चिमुकलीच्या हातात बिबट्याचं पिल्लू पाहिल्यानंतर घरातल्यांची पाचावर धारण बसली. या बिबट्याच्या मागावर असलेल्या बिबट्याने हल्ला केला तर. या विचारानेच सारे घाबरले.
सावधगिरी बाळगत आणि बछड्याला मायेची उब देत त्यांनी दररोज दीड लिटर दूध पाजले. इतकेच नाहीतर दररोज रात्री घराबाहेर ठेवून त्याची आई त्याला घेऊन जाईल, अशी देखील काळजी घेतली. मात्र, वाट चुकलेली बिबट्याची मादी आपल्या बछड्याला घ्यायला आलीच नाही. त्यामुळे अखेर या चिमुकल्या बछड्याला वनविभागाकडे सोपवण्यात आलं आहे. यावेळी शेतकरी कुटूंबाला देखील गहिवरून आले होते.