(सातारा/प्रतिनिधी)
सातार्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील सातारा जिल्हा दौर्यावर असतानाच 5 अट्टल दरोडेखोर लॉकअप तोडून फरार झाले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 5 पोलीस कर्मचार्यांना निलंबित केले आहे.
9 मे रोजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील सातारा जिल्हा दौर्यावर होते. यावेळीच पहाटेच्या सुमारास औंध पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोडेखोर पळून गेले. या घटनेनंतर पोलिसांच्या अकार्यक्षमतेबाबत साशंकता व्यक्त करत तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.