(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे बोटीवरून पडून मृत्यू झालेल्या खलाशाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. सागर संदुराम चौधरी ( ३० , रा . कैलाली नेपाळ सध्या मिरकरवाडा ) असे मृताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद शाहीद महंमद हुसेन मिरकर ( ५२. रा . गवळीवाडा रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर हा शाहीद मिरकर यांच्या मच्छिमार बोटीवर खलाशाचे काम करत होता. ७ मे रोजी खलाशांची हजेरी घेताना तो बेपत्ता असल्याचे शाहीद यांच्या लक्षात आले. दरम्यान सागर याची शोधाशोध करण्यात आली असता रविवार ८ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सागर याचा मृतदेह मिरकरवाडा समुद्राच्या पाण्यात आढळून आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार पालांडे करत आहेत.