राजापूर तालुका भाजपाच्या वतीने रायपाटण कोविड सेंंटरवर रूग्णांना ने आण करण्यासाठी भाजपाचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांच्या आदेशानुसार चार चाकी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाचल भागातील भाजपाचे युवा कार्यकर्ते समिर खानविलकर यांनी हें वाहक उपलब्ध करून दिले.
सध्या कोरोनाच्या महामारी मध्ये संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन असल्याने व त्यातच अनेक ठिकाणी कोरोणाचे रुग्ण आढळत असल्याने त्यांना उपचारासाठी कोवीड सेंटरवर ने आण करण्यासाठी शासनाची उपलब्ध वाहने कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने हकनाक आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या लोकांचे हाल कमी कसे करता येतील या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या आदेशानुसार समीर खानविलकर यांनी स्वत: ची टाटा सुमो गाडी रुग्णांची ने आन करण्यासाठी रायपाटण कोविड केंद्रावर उपलब्ध करून दिली आहे.
ज्या रुग्णांना सदर कोविड सेंटर वर जाणेसाठी वाहन उपलब्ध नाही त्यांना हे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा भाजपाच्या वतीने प्रकारे रुग्णांना ने आण करण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिल्याने आरोग्य विभाग व स्थानिक ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी राजापूरच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.
या वाहनाच्या चाव्या राजापूर तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे व आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आल्या. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, राजापूर तालुका अध्यक्ष अभिजीत यशवंत गुरव समिर खानविलकर, प्रसाद देसाई, सिद्धार्थ जाधव, मनोज गांगण, तुषार पाचलकर आणि प्रमोद मांडवकर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.