(वास्तू)
सध्या प्रखर उन्हाळा सुरू आहे. अनेकांच्या घरी ‘आता तर एसी हवाच’ अशा गोष्टी नियमित होत असतात. परंतु एसी घेताना काही विशिष्ठ गोष्टींची पारख करून घेतला पाहिजे, अन्यथा पश्चाताप करण्याची पाळी येते. इतर काही बाबींची खातरजमा करताना नवीन एसीला एनर्जी रेटिंग काय मिळते हे पाहणे देखील खूप महत्वाचे आहे. पाच स्टार्सपैकी एसीला जितके विजेते तारे दिले जातात, जितकी जास्त वीज वाचते. चांगला एनर्जी रेटिंग असलेला एसी तुमचे वीज बिल जास्त वाढू देणार नाही. एनर्जी रेटिंगनुसार एसी घेणे खूप फायदेशीर ठरते. योग्य एसी खरेदी करताना सर्वप्रथम तुमच्या एसीची क्षमता किती असावी याकडे लक्ष द्या. तुमच्या खोलीचा आकार, त्याचे सामान्य तापमान आणि खोलीतील भिंतींची संख्या, याच्या आधारे एसीची क्षमता निवडली जाते.
AC खरेदी करण्याआधी आपल्या रुमचा आकार पाहणं, रुमच्या आकारानुसार सिलेक्शन करणं महत्त्वाचं ठरतं. खोलीचा आकार लक्षात घेऊन एसी कॅपेसिटी डिझाइन करणं गरजेचं आहे. 100 स्क्वेयर फूटासाठी 0.8 टन एसीचा वापर करू शकता. तर 1500 स्क्वेयर फूट रुमसाठी 1 टन कॅपेसिटीच्या एसीचा वापर करू शकता.
साधारणपणे एसीचे मुख्य तीन प्रकार पडतात. स्प्लिट एसी ,विंडो एसी,पोर्टेबल एसी हे एसीचे मुख्य तीन प्रकार पडतात. या तिन्ही एसीचे स्वतःचे चे असे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. आपण जाणून घेऊ काय आहेत फायदे आहे तोटे.
- स्प्लिट एसी – भिंतीवर जो एसी लावलेला असतो त्याला स्प्लिट एसी म्हणातात. या एसीचे दोन भाग असतात एक आतील बाजूस आणि एक बाहेरील बाजूस. बाहेरील बाजूस जे मशीन बसविलेले असते त्यातून वेगवेगळे वायु बाहेर टाकले जातात. स्प्लिट एसी हा एसीमध्ये सर्वाधिक खर्चिक प्रकार मानला जातो. कारण या एसीची काळजी घेणे अवघड असते. या एसीला सर्वाधिक मेंटेनन्स देखील लागतो. पण या एसीचे दोन फायदे आहेत. ते म्हणजे हा एसी सर्वाधिक वेगाने रूम थंड करतो. तसेच हा एसी कोणत्याही भिंतीवर बसविता येतो. एसी घेताना ही देखील तपासून घ्यावे की, त्यांचे लाइट बिल किती येणार आहे. कारण वर्षभरात आपण किमान ४ महीने तरी एसी वापरतो, जर अधिक वीजबिल येणारा एसी असेल तर नक्कीच तो नक्कीच आर्थिक गणित बिघडवू शकतो.
- विंडो एसी – जर तुम्ही भाड्याच्या घरात रहात असाल तर तुमच्यासाठी विंडो एसी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. स्प्लिट एसीला ज्या प्रमाणे दोन भाग असतात तसे विंडो एसीला नसते. विंडो एसी हे संपूर्ण एकच मशीन असते.हा एसी स्प्लिट एसी पेक्षा थोडासा स्वस्त असतो.याची जोडणी करणे देखील खूप सोप्पे आहे. यांचा मेंटेन्स ठेवणे देखील अतिशय सोप्पे आहे. कारण हा एसी आपण काढून व्यवस्थित साफ करू शकतो. या एसीचे काही तोटे देखील आहेत. जसे की हे मशीन संपूर्ण एक असल्यामुळे यामधून मोठ्या प्रमाणात आवाज येतो. तसेच जर तुमची रूम फार मोठी असेल तर ती संपूर्ण रूम थंड पडणार नाही. कारण या एसीची कुलिंग क्षमता कमी असते. या एसीचा सर्वाधिक तोटा म्हणजे हा एसी खिडकीत ठेवावा लागतो त्यामुळे तुमच्या खिडकीतून काही सुंदर दृश्य दिसत असतील तर ती दृश दिसणार नाहीत. तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे एसी हा टन्सवर घेतला जातो. जसे की एक टन किंवा दीड टन. टन्सवर एसी असल्यावर जितका जास्त टन्स असेल तितके जास्त त्यांची कुलिंग करण्याची क्षमता असते.
- पोर्टबल एसी – पोर्टबल एसी हा आपल्या देशात अजून तितकासा प्रचलित प्रकार नाही. आपल्याकडे पोर्टबल कूलर फार मोठ्या प्रमाणात वापरले जातात.अनेकदा एसी घेताना लोक पोर्टबल एसीला अधिक प्राधान्य देतात. त्यांना वाटते हा एसी आपण सहज कोठेही नेऊ शकतो. जसे की आपण दिवसभर तो हॉलमध्ये वापरू शकतो कारण आपण हॉलमध्ये असतो. रात्रीच्या वेळेस आपण तो बेडरूममध्ये वापरू शकतो. त्यामुळे या एसीला प्रचंड मागणी असते. या एसीचे अनेक फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. फायदे म्हणजे हा एसी आपण सहज एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. हा वजनाला देखील अधिक नसतो. परंतु यांची किंमत अधिक असते. तसेच यांचा आवाज देखील अधिक येतो. जर तुमच्या रूम्स लहान असतील तर नक्कीच हा एसी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
इन्व्हर्टर एसी जास्त महाग असतात पण त्यात एसीचे तापमान नियंत्रित करणे खूप सोपे होते आणि याद्वारे एसी कोणत्याही त्रासाशिवाय वापरता येतो. जेव्हा तुम्ही एसी घ्याल तेव्हा लक्षात येईल की, एसी इन्व्हर्टर किंवा नॉन-इन्व्हर्टर एसी असू शकतो. तुम्ही नॉन-इनव्हर्टर एसी घेतल्यास, याचा अर्थ त्याचा कंप्रेसर एका ठराविक वेगाने काम करतो आणि तो एकतर चालू किंवा बंद केला जाऊ शकतो. इन्व्हर्टर एसी जास्त महाग असतात पण त्यात एसीचे तापमान नियंत्रित करणे खूप सोपे होते आणि याद्वारे एसी कोणत्याही त्रासाशिवाय वापरता येतो.