(चिपळूण)
सावर्डे येथे एका ४० वर्षीय वेडसर प्रौढाचा मृतदेह गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दिसून आला. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . या बाबतची खबर सुरेश देवजी गुढेकर ( ५१, आगवे) यांनी दिली.
मृत हा वेडसर अवस्थेत सावर्डे येथे फिरत असे. गुरुवारी गुढेकर यांनी त्यांची वडापावची टपरी बंद करून ते घरी असताना त्यांना हरिश्चंद्र बारे यांच्या घरासमोरील रस्त्यालगतच्या आंब्याच्या झाडाखाली कचरा टाकण्याच्या ठिकाणी काहीतरी कुजल्याची दुर्गंधी येत होती. गुढेकर यांनी जाऊन पाहिले असता त्यांना वेडसराचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला.