(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
चिपळूण शहरातील भेंडी नाक्याकडून बाजार पुलाकडे जाणाऱ्या एका दिशा रस्त्यावर खेडकडे जाणारा डंपर (क्रमांक MHO8/W8417) चे चाक दहा वर्षे बालिकेच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी 4:30 च्या सुमारास घडला.
काल गुरुवारी संध्याकाळी रिकामा डंपर भेंडी नाका परिसरातून एक दिशा मार्गाने चुकीच्या बाजूने बाजार पुलाकडे जात असता अलिजा रिजवान दिवेकर (वय १० वर्षे राहणार चिपळूण) या बालिकेच्या पायावरून डंपर गेल्याने ती गंभीर जखमी झाली. यावेळी आरडाओरड व झाल्यानंतर गर्दी जमली. यावेळी काहींची चालकाबरोबर बाचाबाची झाली.
सदरची बाब घडल्याची माहिती मिळताच चिपळूणचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे व सहकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी जमावाला शांत करून डंपर हटवला तसेच जखमी अलिजा दिवेकर हिला त्वरित उपचारासाठी चिपळुणातील प्रख्यात लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.या ठिकाणी चिपळूणतील प्रसिद्ध डॉक्टर विष्णू माधव यांनी तिच्यावर उपचार केले. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहे