(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भिमराव य. आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे चिंतन शिबीर रविवारी (दिनांक 9 जुलै 2023 रोजी) सकाळी 10.00 वा. खेडशी हायस्कूल खेडशीनाका, रत्नागिरी येथे आयोजित केले आहे. सदर शिबीराला मार्गदर्शक म्हणून केंद्रातून नियुक्त केलेले आद. प्रदिप कांबळे (मुंबई ) उपस्थित राहणार आहेत.
सदर चिंतन शिबीराला सर्व जिल्हा पदाधिकारी, केंद्रिय शिक्षक-शिक्षिका व प्रत्येक तालुका शाखांचे सर्व पदाधिकारी उपस्थित रहाणे अनिवार्य आहे असे पत्रकातून सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. तसेच तालुक्यातून उपस्थित रहाणा-या कार्यकर्त्यांची संख्या 7 जुलै 2023 पर्यंत जिल्हा सरचिटणीस यांच्याकडे द्यावी असे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी कळविले आहे.