अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. निवृत्त व्हायचं एक वय असतं. सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. भाजपात निवृत्त व्हायचं वय ७५ च्या पुढचं आहे. अशात ८२, ८३ वय झालं तरीही आमचे वरिष्ठ थांबत का नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी केला होता. त्यावर आता शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
मी कुठेही थांबण्याचा प्रश्नच येत नाही. मी आता आणखी जोमाने काम करणार आहे. मी 82 किंवा 92 वर्षांचा असलो तरी माझा प्रभावीपणा व जिगर कायम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. मी अजूनही सक्रीय आहे, काम करतोय असं त्यांनी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर त्यांचेवर अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. दुसऱ्या कुणी काय म्हटलं? त्याला काही अर्थ नाही. कोण काय म्हणतंय त्याच्याशी मला काही करायचं नाही. ही जी कार्यकारिणी झाली ती माझ्या अध्यक्षतेखाली झाली असंही त्यांनी म्हटलं आहे.
कुणाकडे किती संख्याबळ हे वेळ आल्यावर कळेल. आम्हाला अनेक आमदारांचं समर्थन आहे. आमचा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे, असं शरद पवार म्हणत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यांना त्यांनी इशारा दिला आहे. यावेळी शरद म्हणाले की, नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ नाही.
शरद पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला राष्ट्रीय पदाधिकारी आणि प्रदेश पक्षाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, वंदना चव्हाण, पीसी चाको (केरळ अध्यक्ष), योगानंद शास्त्री, जितेंद्र आव्हाड, वीरेंद्र वर्मा (हरियाणा अध्यक्ष)आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं की, देशातील २७ राज्यांचे राष्ट्रवादी पक्षाचे युनिट हे शरद पवार यांच्या सोबत आहे. कुठलेच राज्य फुटले नाही. महाराष्ट्रातील पक्षाचे नेते सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील आमदार म्हणजे पक्ष नव्हे.
"I am working.. no matter I am 82 or 92 ": NCP chief Sharad Pawar
Read @ANI Story | https://t.co/9TRp0uNRcC#Maharashtra #MaharashtraPolitics #NCP #SharadPawar pic.twitter.com/mwXHOMFLwH
— ANI Digital (@ani_digital) July 6, 2023