(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 76 वा वर्धापन दिवस आणि कोकण एसटी प्रेमी ग्रुपचा आठवा वर्धापन दिवस रत्नागिरी आगारात उत्साहात साजरा करण्यात आला. बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे नाव असले तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होते. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, असे एसटी महामंडळाचे नाव होते.
पहिल्या एसटी बॉडी ही लाकडी होती तर छप्पर चक्क कापडी होते. या बसची आसनक्षमता 30 होती. नंतर हळूहळू शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या कंपन्यांच्या बसगाड्या येऊ लागलेला होत्या.रत्नागिरी चे विभाग नियंत्रक यांस कडून केक कापण्यात आला, यावेळी रत्नागिरी आगाराचे चालक वाहक तसेच रत्नागिरी आगाराचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील तसेच स्थानक प्रमुख भाग्यश्री प्रभुणे मॅडम, कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य फरान होडेकर उपस्थित होते