(मुंबई)
उपरोक्त समाजसंस्थेच्या वतीने दापोली, मंडणगड, खेड, महाड, मुंबई येथे कार्यरत असलेल्या समाज बंधू भगिनींचा गौरवशाली अमृत महोत्सव -२०२५ रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत मोठया उत्साहात महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ भोईवाडा परेल मुंबई येथे पार पडला.
सदर अमृत महोत्सवासाठी राज्याचे राज्यमंत्री व आमदार नामदार श्री योगेश दादा कदम व श्री गणेश परशुराम गोसावी, कोकण विभाग नाथपंथीय गोसावी महासंघाचे अध्यक्ष व कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मान्यवरांचे स्वागत व सत्कार, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ज्येष्ठ सभासद यांचा सत्कार तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षक व वकिली अशा विविध क्षेत्रात प्रविण्य मिळविलेल्या समाज बंधु भगिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर समाजाची स्मरणिका प्रकाशन, महिलांचा हळदीकुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. स्नेहभोजनसाठी श्री. कोलगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. यशवंत विठोबा काणेकर व अमृत महोत्सवाचे कार्याध्यक्ष श्री. नारायण धोंडू रहिराशी व श्री. संजय रामचंद्र लाड यांनी महत्वाची भूमिका निभावली. कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाचे उपाध्यक्ष श्री. अरविंद गोसावी तसेच मंचकावरील उपस्थित मान्यवर श्री. (डॉ.) रविंद्र खांबल, श्री. अनंत निकम, श्री. शंकर खांबल, श्री. अरविंद गोसावी आणि श्री. यशवंत तावडे यांनी समाज उन्नतीविषयी मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव श्री. जयेंद्र आबाजी जांभळे, उपाध्यक्ष श्री. दशरथ महादेव जांभळे श्री. पांडुरंग काशिनाथ लाखे, उपसचिव श्री. राजेंद्र शांताराम खांबल, श्री. पांडुरंग सिताराम गोसावी, खजिनदार श्री. महेश विठोबा काणेकर, हिशोब तपासणी श्री. सुधीर राजाराम लाड, श्री. विनायक नारायण खांबल तसेच सल्लागार श्री. वसंत केशव रहिराशी श्री. चंद्रकांत राजाराम गोसावी श्री. विजय शंकर काणेकर तसेच महिला संघटक श्रीमती वनिता अनंत काणेकर त्याचप्रमाणे सहाय्यक कमिटी यांच्या देखरेखखाली नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्व उपस्थितांचे व कार्यकारणीचे मनःपूर्वक आभार मानून संस्थेचे अध्यक्ष श्री. यशवंत काणेकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.