(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव बाजारपेठ नजीक असलेल्या दत्तकृपा निवास येथील वास्तव्यास असलेले शिक्षक संजय बाळासो थोरात यांच्या मातोश्री सौ.रंजना बाळासो थोरात या १ सप्टेंबर पासून जाकादेवी खालगाव येथून बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता त्या परिसरात कोठेही आढळून आल्या नाहीत, या घटनेची तक्रार त्यांचा मुलगा संजय थोरात यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.
सौ. रंजना थोरात यांचे वय ७३ असून त्यांचे शिक्षण १५ वी पर्यंत झाले आहे. त्या जाकादेवी खालगाव येथे आपल्या मुलाच्या कुटुंबासमवेत राहत होत्या. त्या १ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर पडल्या. त्यानंतर दुपारनंतर त्या घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली.जाकादेवीसह इतर परिसरात त्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्या़चा मुलगा संजय थोरात यांनी आपली आई बेपत्ता असल्याची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनला केली.
त्यांचे वर्णन असे -उंची ५.२ फूट, नीम गोरा रंग, लांब केस वेणी घातलेली, कानात कर्णफुले सहावारी पांढरट रंगाची साडी, सोबत छोटी पर्स आहे. पोलीस स्टेशनकडून सौ.रंजना थोरात या ७३ वर्षीय महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कामी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फौजदार, खालगाव बीट अंमलदार किशोर जोशी व त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत.