( खेड )
शहरातील महाडनाका येथील धोकादायक स्थितीतील रिकामी खासगी चाळीचा काही भाग मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळल्यानंतर धोकादायक बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नगरप्रशासनाने यापूर्वीच शहरातील धोकादायक बांधकाम असणाऱ्यांना ७३ जणांना नोटीस बजावल्या आहेत. नगरप्रशासनाची रितसर परवानगी घेवून धोकादायक ठिकाणांचे बांधकाम करण्याचे निर्देश देखील दिल्याचे नगरप्रशासनाने स्पष्ट केले आहे. धुवाँधार पर्जन्यवृष्टी झाल्यास उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते, प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्जता ठेवली आहे. विशेषतः पूरप्रवण क्षेत्रावर करडी नजर ठेवण्यात आली असून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसह मदतकर्त्यांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महाडनाका येथील खासगी रिकामी चाळ कोसळल्यानंतर धोकादायक बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र महाडनाका येथील धोकादायक स्थितीतील रिकामी चाळ खाली करण्यासाठी संबंधित मालकास नगरप्रशासनाने यापूर्वीच नोटीस बजावली होती.