(संगमेश्वर / एजाज पटेल)
भविष्यात मुंबई ते गोवा महामार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता नजरेसमोर ठेऊन केंद्र आणि राज्य सरकारने नवा मुंबई ते गोवा सुपरफास्ट महामार्ग करण्याचे ठरवले आहे. कोकणच्या ७२० किलोमीटर समुद्र किनाऱ्याजवळून हा सुपरफास्ट महामार्ग जाणार आहे. त्यासाठी तब्बल २६ हजार कोटी रुपये खर्च येणार असून हा महामार्ग ५०० किमी लांबीचा असणार आहे. त्यामध्ये ९० पर्यटन स्थळांना हा महामार्ग जोडणारा एकमेव असा दुवा असणार आहे. नवे पुल बांधण्यात येणार असून त्यांची लांबी तब्बल २७ किलोमीटर इतकी असणार आहे. हा सुपरफास्ट महामार्ग कॅलिफोर्निया येथील पॅसिफिक महामार्गासारखा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणचा खऱ्या अर्थाने कॅलिफोर्निया होण्याचे जे स्वप्न कोकणी माणसांनी पाहिले होते ते भविष्यात स्वप्न न राहता प्रत्यक्षात सत्यात उतरणार आह
महामार्गाचे काम १२ वर्षांपासून सुरू
गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे विस्तारण्यात आले आहे. हजारो किलोमीटर चे नवीन महामार्ग विकसित झाले आहेत. गत दहा वर्षाच्या काळात जेव्हापासून देशात मोदी सरकार आले तेव्हापासून देशात अनेक मोठमोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई गोवा महामार्ग प्रकल्प हा देखील असाच एक प्रकल्पातून याचे काम तब्बल १२ वर्षा पासून सुरु आहे. मात्र भविष्यात मुंबई ते गोवा हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
नव्या महामार्गासाठी २६ हजार कोटींचा खर्च करून एक नवा महामार्ग विकसित केला जाणार आहे. २६ हजार कोटी रुपये खर्च करून ५०० किमी लांबीचा एक नवीन महामार्ग विकसित होणार असून या महामार्गाचे काम कॅलिफोर्निया येथे असणाऱ्या पॅसिफिक महामार्गाच्या धर्तीवर होणार आहे. मनमोहक आणि अथांग समुद्र किनारा, कोकणातील हिरवीगर्द, निसर्गरम्य, निसर्ग संपदा, ऐतिहासिक गड किल्ले, कोकणी परंपरा, सह्याद्रीच्या कुशीतील पर्वत रांगा, फेसाळते धबधबे, संथ वाहणाऱ्या नद्या, कोकणची खाद्यसंस्कृती, फळांच्या बागा यासाठी आकर्षित करण्यासाठी आणि लवकर तसेच सुलभ प्रवास व्हावा यासाठी हा सुपरफास्ट महामार्ग कोकणचा कायापालट करील असे तज्ञांचे मत आहे.
समुद्रकिनारा, पर्वत रांगातून जाणार महामार्ग
मनमोहक समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या पर्वत रांगातून हा महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाला समांतर राहणार आहे. या प्रकल्पांतर्गत रेवस ते रेड्डी दरम्यान नवीन सुपर हायवे विकसित होणार आहे. या प्रकल्पांतर्गत सात नवीन पूल तयार होणार असून या पुलांची लांबी २७ किलोमीटर एवढी राहणार आहे. हा महामार्ग चार पदरी राहणार आहे.