(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र १७ यांच्या मार्फत ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात धम्म ध्वजाचे अनावरण करून धार्मिक पूजापाठ घेऊन झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यामध्ये सानवी पवार, आराध्या पवार, हर्ष पवार, आर्या पवार, प्रशिल पवार, प्रथम पवार, आर्वी पवार, प्रणाली पवार या मुलांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपले विचार मांडले तसेच दिवाकर पवार शरद पवार, दिलीप पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व समितीचे अध्यक्ष रविकांत पवार यांनी आपल्या मार्गदर्शन पर मनोगतातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर हे ठिकाण का निवडले, तसेच धम्माचा प्रसार कसा झाला, सध्या धम्माची वाटचाल कोणत्या दिशेने आहे, त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्धांनी जी शिल सांगितली आहेत त्यांचे पालन बौद्धांनी कसे करावे अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित जनसमुदायासमोर कथन केल्या.
या कार्यक्रमाला वाडीतील सर्व महिला पुरुष लहान मूल बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शाखेचे सचिव शाम पवार यांनी केले, आणि आभार सहसचिव मयुरेश पवार यांनी केले.