(संगमेश्वर)
तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था आयोजित चौदावा दादासाहेब सरफरे आंतरशालेय तालुकास्तरीय कला क्रीडा महोत्सव दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक ०६ व ०७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या दोन दिवशीय चालणाऱ्या महोत्सवाला तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सुमारे १२०० ते १५०० विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात. या महोत्सवात कबड्डी, खो-खो तसेच मैदानी स्पर्धा या स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या तृतीय क्रमांकासह व उत्तेजनार्थ अशी संघासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
दादासाहेब सरफरे आंतरशालेय कला क्रीडा महोत्सव २०२३ हे महोत्सवाचे चौदावे वर्ष आहे. ग्रामीण भागातील विद्याथ्यांच्या अंगभूत कला व क्रीडा गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कला – क्रीडा गुणांच्या विकासाला चालना मिळावी याच प्रमुख उद्देशाने महोत्सवाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना संस्थेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाचा फायदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना होताना दिसत असून विद्याथ्यर्थ्यांनी आपली चमकदार कामगिरी जिल्हा, विभाग आणि राज्यपातळीवर दाखविली आहे. अलिकडच्या काळात मोबाईल आणि इंटरनेमुळे विद्याथ्याँचा मैदानी खेळाकडचा कल कमी होताना दिसत आहे. म्हणूनच कला व क्रीडाक्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि खेळाच्या माध्यमातून शरीर देखील तंदुरुस्त रहावे याच उदात्त हेतूने या महोत्सवाचे आयोजन बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. हा महोत्सव असाच अविरत चालू ठेवण्याचा संस्थेचा मनोदय आहे.
यावर्षी दादासाहेब सरफरे आंतरशालेय महोत्सव दिनांक ०६ व ०७ जानेवारी २०२४ या कालावधीत विद्यालयाच्या भव्य क्रीडानगरीत होत आहे. महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी एका वेगळया स्पर्धेचे आयोजन करण्यावर संस्था चालकांचा नेहमीच भर असतो, हा महोत्सव म्हणजे ग्रामीण भागातला प्राथमिक शाळेतील विद्याध्यर्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्याध्यांच्या विविध कला क्रीडा गुणांना प्रोत्सासहित करणारे व्यासपीठ ठरत आहे. हा महोत्सव म्हणजे तालुक्यातील विद्याथ्यांसाठी नैपुण्य दाखविण्याची जणू संधीच आहे. महोत्सवात सुमारे १५५० विद्यार्थी सहभागी होत आहेत. महोत्सवाच्या यशस्वीते करिता संस्था उपाध्यक्ष राजाराम गर्दे, उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, सचिव शरद बाईत, कला-क्रीडा समिती अध्यक्ष सचिन मोहिते, सेक्रेटरी दिनेश जाधव, उपाध्यक्ष विक्रांत जाधव ललित लोटणकर मेहनत घेत आहेत.
या महोत्सवात तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोकभाई सरफरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश वीरकर यांनी केले आहे.