(मुंबई)
बहुप्रतिक्षित 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला आजपासून सुरुवात झाली आहे. या लिलावात देशातील तीन खासगी टेलिकॉम कंपन्या आणि अदानींची एक कंपनी अशा चार जणांनी सहभाग घेतला आहे. जिओ, व्होडाफोन आणि एअरटेलसह गौतम अदानींची बोली लावणार आहेत. यामध्ये खरी स्पर्धा अदानी आणि अंबानींमध्ये आहे. सध्यातरी स्पर्धा नसली तरी भविष्यात या दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. 72 जीएसचझेड स्पेक्ट्रमचा लिलाव 4.3 लाख कोटी रुपयांवर सुरु झाला आहे. त्याची वैधता 20 वर्षे असेल. लिलावात यशस्वी ठरलेली कंपनी याद्वारे 5 जी सेवा देऊ शकणार आहे. विविध स्तरावरील बँड विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. मुंबई, पुणे, दिल्लीसह दहा शहरांमध्ये सुरुवातीला ही सेवा सुरु केली जाईल. या सुपरफास्ट सेवेचा सामान्यांच्या दैनंदिन जीवनात काय फायदा होईल हे ही सेवा प्रत्यक्षात आल्यावरच समोर येणार आहे. मोठ्या शहरांमध्ये हे तंत्रज्ञान लवकरच उपलब्ध होणार आहे. पण गावे आणि छोट्या शहरांना अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. 5जी सेवा सध्याच्या 4जी सेवांपेक्षा सुमारे 10 पट वेगवान असेल. लिलावादरम्यान रिलायन्स जिओला अधिक खर्च अपेक्षित आहे. सध्या ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.