( रत्नागिरी )
58 व्या महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. मेन्यू 25 कॅम्पचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर रत्नागिरीत राबवण्यात आले होते. यामध्ये एकुण ६० राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुला व मुलीनी सहभाग घेतला होता. या शिबिराचा रत्नागिरीत 14 नोव्हेंबर रोजी सांगता समारोप पार पडला.
दरम्यान हे शिबिर ०५ नोव्हेबर ते १४ नोव्हेबर २०२४ पर्यत या कालावधीत घेण्यात आले होते. रत्नागिरी ते वरवडे, जयगड, तवसाळ, बोरी या मार्गी हा नॅशनल स्थरावरील मेनु २५ कॅम्प यशस्वी रित्या पार पडला शिबीराचे प्रमुख सुत्रधार कमांडर के राजेश कुमार समादेशक अधिकरी २ महा नेवल युनिट एन सी सी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेनु २५ कॅम्प यशस्वीरित्या पार पडला.
या शिवीरासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट सहभागी झाले होते. या दहा दिवसाच्या शिबिरात अनेक अक्टीवीटी मध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती अभियान, “हमारा समुद्र हमारी शान” याबाबत पथनाटयातुन राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट यांच्या मार्फत सागरी किनारे स्वच्छताचा संदेश देण्यात आला.
या कॅम्पमध्ये एकुण ०२ नेव्ही अधिकारी, ०२ एन सी सी ऑफीसर, व ०१ जे सी आय ०९ नेवी स्टाफ, ०१ अर्मी स्टाप ०७ सिवील स्टाफ, व ६० राष्ट्रीय छात्र सेनाचे कॅडेट विदयार्थी यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.