(फुणगूस / एजाज पटेल)
लांजा येथील पोलीस ठाण्यात वर्षभरापूर्वी रुजू झालेले कर्तव्यदक्ष तसेच तालुक्यात दबंग पोलीस निरीक्षक म्हणुन ख्याती असलेले निळकंठ बगळे यांचा 50वा वाढदिवस लांजा येथील प्रतिष्ठित तसेच सर्वसामान्यासह, व्यापारी, पत्रकार, राजकीय पदाधिकारी, पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या दिमाखात साजरा केला. वाढदिवसानिमित्त निळकंठ बगळे यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः रांग लागली होती. लांजावासियांचे हे प्रेम पाहून निळकंठ बगळे हे अक्षरशः भारावूनच गेले.
मूळचे सिंधुदुर्ग जिल्हा येथील असलेले निळकंठ बगळे हे वर्षभरापूर्वी लांजा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावर रुजू झाले आहेत. येथील कार्यभार हाती घेताच त्यांनी लोकाभिमुख भूमिका घेत कामाला सुरुवात केली. आपल्या अटल समर्पण आणि कठोर परिश्रमासाठी ओळखले जाणारे नीलकंठ बगळे यांनी वेळोवेळी निर्भीड व निष्पक्षपणे समाजाची सेवा केली आहे. पोलीस अधिकारी असला तरी तो एक माणूस असून त्याला देखील मन आहे, याचा प्रत्यय त्यांनी काही दिवसातच लांजावासियांना स्वतःच्या कर्तृत्वातून दाखवून दिला.
कायदा सुव्यवस्था राखतानाच सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सर्वसामान्य घटकांशी थेट संवाद ठेवण्याची कार्यप्रणाली त्यांनी अवलंबली. त्यामुळे काही दिवसातच ते लांजावासियांना आपलेसे वाटू लागले. मंगळवार 4 फेब्रुवारी या दिवशी असलेला त्यांचा 50 वा वाढदिवस त्यांनी तालुक्यातील विलवडे येथील आश्रम शाळेतील मुलांना खाऊ वाटप तसेच त्यांना यथोचित मदत करून साजरा केला.
वाढदिवस असल्याची माहिती मिळताच लांजा तालुक्यातील रिक्षाचालक अनेक व्यापारी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, पोलीस मित्र, गावागावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, लांजा तालुक्याचे डी.वाय.एस.पि यशवंत केडगे,प्राविक्षाधीन पोलीस अधीक्षक क्षितिज पाटील आदींनी लांजा पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
दिवसभर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. तर काहींनी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडिया सारख्य माध्यमावरून शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील वाटचालीस सुद्धा शुभेछा दिल्या. लांजावासियांचे हे प्रेम पाहून पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे अक्षरशः भारावून गेले होते.