(रत्नागिरी)
रेल्वेच्या तिरुनेलवेली जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची चेन चोरट्याने लांबवली, शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. १३) सकाळी साडेनऊच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशनदरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवासी महिला या तिरुनेलवेली जामनगर एक्स्प्रेस गाडीने इंजिनच्या बाजूच्या जनरल डब्यातून झोपून प्रवास करत होत्या. रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आल्यानंतर त्यांना समजले की, त्यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची चेन गायब झाली. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1