(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट जाणवू लागली आह़े. मुंबईमध्ये देखील पारा 16 डिग्री सेल्सीअस पर्यंत खाली आला आह़े. तर जिल्ह्यात दोन दिवस पारा घसरला आहे. दिवसाही हुडहुडी लागत असल्याने बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. पुढील 48 तासात जिल्ह्यात थंडीची लाट वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आह़े. त्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. तापमान आणखी घसरल्यास आंबा काजू फळवाढीवर परिणाम होण्याची भिती देखील व्यक्त करण्यात येत आह़े.