(रत्नागिरी)
देव्हाऱ्यात देवाच्या पुस्तकामध्ये कपड्यात गुंडाळून ठेवलेले ४० हजार रुपये चोरट्याने दिवसाढवळ्या चोरून नेले. ही चोरी शुक्रवारी रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे घडली.
याबाबत सिद्धार्थ रामचंद्र कदम (६३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कुवारबाव येथील विठ्ठल मंदिराजवळ सिद्धार्थ कदम यांचे घर आहे. शुक्रवारी सकाळी ११:३० ते दुपारी १२:१५ वाजण्याच्या दरम्यान घरात कोणीही नव्हते. त्याच दरम्यान, त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्याने देव्हाऱ्यात ठेवलेले पैसे चोरून नेले. दुपारी घरातील सर्व मंडळी घरी आले असता, ही चोरी झाल्याचे लक्षात आले.
याबाबत रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.