(रत्नागिरी)
शहरातील राजिवडा-शिवखोल येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. यांच्याकडून गांजा या अमली पदार्थाच्या ३८ पुड्या, रोख रक्कम, वजनकाटा असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सलमा नाजीम पावसकर व मुजीब दिलाल चाऊस (रा. शिवखोल) असे पकडण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. शिवखोलमध्ये गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात छापा टाकून कारवाई करण्यात आली. कारवाईत सलमा पावसकर व मुजीब चाऊस यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३४० ग्रॅम वजनाचा गांजाच्या ३८ पुड्या, वजनकाटा, रोख रक्कम इतर साहित्यासहित ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रत्नागिरी शहर हे सुसंस्कृत म्हणून ओळखले जाते. मात्र शहरात मावा, गुटखा, चरस, गांजा याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे वारंवार पुढे आले आहे. पोलिसांनी त्या विरोधात घडक मोहीम हाती घेतली तरी पोलिसदलाला यावर अंकुश घालता आलेला नाही. अमली पदार्थांचा विळखा वाढत असून, यामध्ये विद्यार्थ्यांसह तरुण पिढी गुरफटली जात आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1