(जीवन साधना)
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म हा एका ठरविक वेळ, महिना आणि वर्षात होत असतो. त्याच आधारावर प्रत्येक माणसाची रास आणि वैशिष्ट्य, त्यांचा स्वभाव ठरत असतो. तसंच प्रत्येक माणसाच्या सवयीदेखील त्यांच्या राशीच्या गुणधर्मानुसार असतात. वृषभ ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी दुसरी रास आहे. जन्मकुंडलीतील २ आकड्याने दर्शवतात. वृषभ राशीवर शुक्र (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते.
वृषभ – (ई, ओ, ए, ओ, वा, वि, वू, वे, वो)
राशी स्वरूप – बैलासारखे
राशी स्वामी – शुक्र
भाग्यवान क्रमांक – 6 अंक भाग्यवान, त्यामुळे 6, 15, 24, 33, 42, 51 या 6 अंकांची मालिका शुभ.
लकी कलर – निळा आणि जांभळा
भाग्यदिन – शुक्रवार
लाभदायक रत्न – हिरा अथवा पोवळे
करिअर – शेफ, डॉक्टर, चित्रकार, शिल्पकार (हस्त कौशल्य करिअर)
वैशिष्ट्ये, वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व
वृषभेचा स्वामी शुक्र आहे आणि हि रास दक्षिण दिशेची मालकीण आहे. सांसारिक कामात कुशलतेने आणि हुशारीने काम करणे हा अशा व्यक्तींचा स्वभाव असतो. वृषभ राशीचे लोक खूप दयाळू, हुशार असतात. ते अनावश्यक वादात पडत नाहीत. बहुतेक वृषभ राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात. पण यांना राग आला तर मात्र यांना सांभाळणे फार कठीण होऊन बसते. या लोकांना त्यांचा राग शांत व्हायला खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत ते समोरच्या व्यक्तीला खूप काही बोलून जातात. हे लोक चुकीचे वागणे सहन करू शकत नाहीत. राशीचं चिन्ह वृषभ म्हणजे बैलाद्वारे दर्शविलं जातं. बैल हा प्राणी स्वभावतः खूप मेहनती आणि कर्तव्यदक्ष असतात. सहसा बैल शांत आणि नियंत्रित राहतो परंतु जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो बिथरतो. वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये बैलांचा हा गुण अगदी जसाच्या तसा लागू होतो. या राशीच्या लोकांना संपत्ती आणि प्रसिद्धीची लालसा असते. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची पूर्ण जाणीव असते. ते अंतर्मुख आणि विश्वासार्ह असतात
वृषभ राशीचे लोक मूळातच खूप हट्टी असू शकतात. यासह, त्यांच्यात सुस्तपणा देखील दिसू शकतो. वृषभ राशीचे मूळ लोक विश्वासू, कष्टकरी, धैर्यशील आणि मेहनती असतात, म्हणूनच ते कृषी, बँकिंग, वैद्यकीय, शैक्षणिक आणि बांधकाम क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. त्यांच्या परिश्रम आणि समृद्धीमुळे ते मोठ्या यश आणि समृद्धीच्या उंचीवर जाऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांचा अशाच प्रेमावर विश्वास असतो जे खोल असतं आणि सामर्थ्य दर्शवतं. नात्यातल्या खोटेपणाचा त्यांना सहन होत नाही, त्यांना बोगस प्रेमात अजिबात रस नसतो. प्रेमासंबंधी ते स्वतःचं चारित्र्य आरशासारखं स्वच्छ ठेवणं पसंत करतात आणि दुसऱ्यांकडूनही त्यांची तीच अपेक्षा असते. वृषभेच्या व्यक्तींना लग्न आणि लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्टी साध्य करण्याची इच्छा असते. या लोकांचं मिथुन, कन्या आणि मकर राशीच्या लोकांशी चांगलं जमतं. या व्यतिरिक्त मेषेच्या व्यक्तींशी काही वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं तर मेष-वृषभ एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात.
वृषभ राशीचा स्वामी मॉर्निंग स्टार असणारा शुक्र ग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींना त्यांनी केलेल्या कठोर परिश्रम आणि चिकाटीचं फळ कुठल्याही किमतीत हवंच असतं. जास्त विचार न करता वृषभ राशीचे लोक जड कामंही स्वीकारतात, ज्यामुळे कदाचित त्यांना भविष्यात समस्या उद्भवू शकतात. या राशीच्या लोकांना सहजासहजी फसवता येत नाही. या राशीचे लोक आपल्या मौजमजेवर खूप पैसा खर्च करतात आणि हे लोक अजिबात कंजूष नसतात. या राशीचे लोक सुंदर गोष्टींकडे आकर्षित होतात. त्यांना आपल्या आवडीच्या व्यक्तीकडूनच शारीरिक सुख घेणे पसंत असते. त्यांना सर्जनशील आणि कलात्मक कामांमध्ये रस असतो. तर स्वतःसोबतच ते इतरांच्या मनाचाही आदर करतात. त्यांच्या आयुष्यात प्रवासाचे योग अधिक असतात. मात्र ते स्वतःच्या तत्त्वांवर ठाम असतात. वृषभ राशीचे लोक हट्टी, मूडी, आक्रमक आणि बुद्धिमान असतात. त्यांना ऐश्वर्य आणि आलिशान राहणीमान आवडते. महागड्या गोष्टींबद्दल त्यांना अधिक ओढ असते. ते महागडी वस्तू खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे त्यांना उतावीळ स्वभावाचे म्हटले जाते.
वृषभ राशीच्या लोकांना शांतता आवडते. ते आपले काम अतिशय तन्मयतेने करतात. ते एखाद्या कामात अडकले तर त्याचे निराकरण होईपर्यंत किंवा ते पूर्ण होईपर्यंत ते सोडत नाहीत. वृषभ राशीच्या लोकांना पुस्तकं वाचण्यात, खेळात, नृत्यात आणि इतरही बर्याच गोष्टींमध्ये रस घेतात. त्यांना ज्योतिषशास्त्र, खेळ, नृत्य, गायन, सत्संगती, चांगल्या गोष्टींचा संग्रह, कथा-कीर्तन इत्यादींशी संबंधित पुस्तके वाचणे यामध्ये खूप रस असतो. या राशीचे लोक संगीताच्या गुणांनी संपन्न असतात. तर आपल्या भाषणाने, एका वेळी शेकडो लोकांना प्रभावित करण्याची आणि आकर्षित करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. या राशीच्या पुरुषांना खेळाची तर महिलांना कपड्यांबद्दल खूप आकर्षण असते. हे लोक नवीन माहिती गोळा करण्यात, घटना आणि ठिकाणे जाणून घेण्यात आणि वर्णन करण्यात अधिक रस घेतात.
वृषभ राशीला धमकावणे हे स्वतःसाठी संकटाला आमंत्रण देण्यासारखे असते. कधीकधी हे लोक रागाच्या भरात अनेक मर्यादा ओलांडतात. ते स्वतः भांडत नाहीत, पण कोणी मुद्दाम त्यांच्याशी भांडण केलं तर मात्र त्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाहीत. मेष राशीच्या लोकांप्रमाणे हे लोक देखील स्वभावाने हट्टी असतात. त्यांचा एक मोठा दोष म्हणजे ते खूप आळशी असतात. वृषभ राशीच्या लोकांचा चेहरा आनंददायी असतो.
अंतर्मुख वर्तन
वृषभ राशीचे लोक त्यांच्या शांत आणि अंतर्मुख स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांना नवीन लोकांना भेटणे फार आवडत नाही. स्वभावाने खूप मेहनती असल्यामुळे ते आपल्या व्यवसायात आणि कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळवतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही कामुकतेची भावना असते. हे लोक नेहमी सर्व क्षेत्रात भौतिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे लोक आपले काम ठराविक वेळेत पूर्ण करतात आणि इतरांच्या प्रयत्नांचेही कौतुक करतात. या राशीच्या लोकांना कोणी सहज आकर्षित करू शकत नाही. तर संधीचा फायदा कसा घ्यायचा हे त्यांना माहीत असते. मात्र हे लोक स्वार्थी नसतात. या लोकांना सर्व चांगल्या आणि सुंदर गोष्टी आवडतात आणि बहुतेकदा ते भौतिक सुखांनी वेढलेले असतात. वृषभ राशीमध्ये जन्मलेले लोक खूप कामुक आणि हळवे असतात. याशिवाय, वृषभ राशीच्या लोकांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे ते खास बनतात.
आरोग्य
या राशीच्या लोकांना घशाचा त्रास होऊ शकतो. हे लोक निरोगी राहतात, परंतु जेव्हा त्यांच्या राशीमध्ये अशुभ ग्रह येतात किंवा शुक्र अशक्त असतो, तेव्हा शरीरात अनेक रोगांची लक्षणे दिसू लागतात. जसे की वीर्य विकार, मूत्रविकार, डोळ्यांचे रोग, तोंडाचे रोग, पांडू. स्रावी रोग, प्रमेह, वीर्य कमजोर, संभोग करण्यास असमर्थता, जास्त कामामुळे प्रेशरमुळे मज्जातंतू, मधुमेह, संधिरोग आणि श्लेष्मल विकार, स्वप्नदोष, शीघ्रपतन, धातूचा क्षय, कफ आणि बद्धकोष्ठता, वायु विकार आणि स्फिंक्टर यांसारख्या रोगांचा त्रास त्यांना जाणवू शकतो. वृषभ राशीचे लोक थोडे पुराणमतवादी असतात. हे लोक वाईट काळात वाईट सवयींमध्ये सहज अडकतात. त्यांच्या लाजाळू स्वभावामुळे या राशीच्या लोकांना नवीन मित्र बनवण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तर कधी कधी जास्त विचार केल्याने ते मानसिक आजारी पडतात.
स्वभावाने हट्टी, प्रचंड मेहनती
वृषभ राशीचे लोक हट्टी, मूडी, आक्रमक आणि बुद्धिमान असतात. त्यांना ऐश्वर्य आणि आलिशान राहणीमान आवडते. महागड्या गोष्टींबद्दल त्यांना अधिक ओढ असते. ते महागडी वस्तू खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे त्यांना उतावीळ स्वभावाचे म्हटले जाते. परंतु, कुणाचाही विश्वास बसणार नाही, अशाप्रकारे ते समर्पित, वचनबद्ध आणि मेहनती लोक असतात. ते त्यांना आवडीची कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी दिवसरात्र काम करण्यास तयार असतात. त्यांना जे काही करायचे असते, त्यात त्यांना ‘परफेक्शन’शिवाय दुसरे काही नको असते. ते प्रचंड जिद्दी असतात. जेव्हा नात्याचा विषय येतो, त्यावेळी ते विश्वासार्ह आणि भरवशाचे मित्र असल्याचे नाते जपतात.
संयम
वृषभ राशीचे लोक एखाद्यावर प्रेम करण्यात तसेच त्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवण्यास कधीही वेळ देण्यास तयार असतात. त्यांचे जीवनसाथी बनू पाहणाऱ्या तरुण-तरुणीने पुरेसा संयम बाळगला पाहिजे. या राशीच्या लोकांशी नाते जोडताना घाई करू नये. वृषभ लोकांना कुठलाही विषय चघळत बसणे आवडत नाही. ते प्रामाणिक, बोथट आणि साधेसरळ असतात. ते स्वत:सुद्धा आपल्या साथीदाराकडून अशाच स्वभावाची अपेक्षा करतात. त्यांचा जोडीदार त्यांच्यासारखाच प्रामाणिक आणि सत्यवादी असायला पाहिजे. वृषभ लोकांना काम करायला खूप आवडते. ते ऐश्वर्य मिळवण्यासाठी कितीही तास काम करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांचा जीवनसाथी देखील कामासाठी असाच कटिबद्ध असावा असे त्यांना वाटते. वृषभ राशीचे लोक इतरांचा विश्वास बसणार नाही, इतक्या अधिक प्रमाणात विश्वासार्ह असतात. त्यांच्यावर नक्कीच कुणीही विश्वास ठेवू शकतो.
राशी विषयी थोडक्यात :
- या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल हा मुळात कष्टाळू आणि शक्तिशाली असतो. तो सामान्यत: शांत असतो. परंतु राग आल्यास उग्ररूप धारण करू शकतो.
- या अंतर्गत कृत्तिका नक्षत्राचे तीन चरण, रोहिणीचे चार आणि मृगाशीर्षाचे पहिले दोन चरण येतात.
- या व्यक्तींच्या आयुष्यात पिता-पुत्र कलह जास्त पाहायला मिळतो.
- वडिलांकडून भूमीसंबंधी काम होते किंवा त्यातून एखाद्या उपजीविकेचे साधन निर्माण होते. या राशीच्या मुलांना बहुतांश तामसी भोजनात स्वारस्य असते.
- गुरूच्या प्रभावामुळे पुत्रामध्ये ज्ञानाप्रति अहंभाव निर्माण होऊ शकतो.
- यांचा सरकारी कामांकडे कल असतो. सरकारी ठेकेदारीचे काम करून घेण्याची यांचेकडे पात्रता असते.
- मंगळाच्या प्रभावामुळे जातकामध्ये मानसिक गरमी निर्माण होत असते.
- कारखाने, स्वास्थ्य कार्य आणि जनतेचे वाद सोडवण्याचे कार्य हे लोक करू शकतात.
- हे लोक सौंदर्यप्रेमी आणि कला प्रिय असतात. कलेच्या क्षेत्रामध्ये हे लोक नाव कमावतात.
- हे लोक जोडीदाराच्या अधीन राहणे पसंत करतात.
- चंद्र-बुधाच्या प्रभावामुळे या लोकांना अपत्य रुपात मुलगी होण्याची शक्यता जास्त असते.
- यांच्या जीवनात व्यापारानिमित्त यात्रा दौरे प्रमाणाबाहेर होतात.
- डोक्यामध्ये नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार असतो. अनेकदा हे स्वतःच्या षडयंत्रामध्ये स्वतःच अडकतात.
- रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या चरणाचा स्वामी चंद्र असल्यामुळे यांच्या मनाची चढ-उताराची स्थिती कायम राहते.
- या राशीच्या लोकांचे शरीर जोमदार असते, त्यामुळे ते सुंदर व आकर्षक दिसतात.
- या राशीचे लोक खूप स्वाभिमानी असतात. यांचा स्वाभिमान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडलेला असतो. स्वाभिमानाचा मार्ग आणि थंडपणा यांच्या डोळ्यांत काहीवेळा स्पष्टपणे दिसतो.
- यांचे मनोबलही खूप उंचावलेले असते. एकदा का त्यांच्या मनात काही करायचे ठरवले की ते पूर्ण करूनच ते ठेवतात. अत्यंत कठीण परिस्थितीतही ते डगमगत नाहीत.
- यांची मेहनत आणि जिद्द त्याच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. त्यांच्या क्षमतेच्या जोरावर ते आरामदायी जीवन जगतात.
- सामाजिक सन्मान मिळवण्याचे सर्व गुण त्यांच्यात असतात. या राशीचे लोक कधी कधी स्वभावाने हट्टी होतात. यांच्या हट्टी वृत्तीमुळे अनेक लोक यांना अहंकारी देखील समजतात.
- शुक्र राशीचा स्वामी असल्यामुळे वृषभ राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्येही खूप सर्जनशील आणि कलात्मक असतात. हे लोक सर्व काही मोठ्या आवडीने करतात.
- धर्मावरही यांची गाढ श्रद्धा असते. हे लोक चांगल्या विचारांचे धनी असतात. त्यांच्या विचारात शुद्धता असते.
- वृषभ राशीचे लोक प्रेमासाठी समर्पित असतात आणि त्यांना स्वतःबद्दल त्याच प्रकारचे समर्पण हवे असते. हे खूप रोमँटिक स्वभावाचे लोक असतात.
- हे लोक त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान आणि प्रामाणिक असतात, मात्र त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच वागण्याची ते अपेक्षा करतात.
- साधारणपणे, यांना राग येत नाही, परंतु जेव्हा यांच्या संयमाचा बांध फुटतो, तेव्हा त्यांच्या रागातून कोणी सुटणे कठीण असते.
- वृषभ राशीच्या व्यक्तींची कल्पनाशक्ती अत्यंत चांगली असते. पण असं असलं तरी स्वःतासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा अंदाज या व्यक्ती लावू शकत नाहीत. या व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली आणि आदर्श बनविण्याचा प्रयत्न करत असतात.
- वृषभ राशीच्या व्यक्ती या जिद्दी असतात आणि कोणत्याही गोष्टीसाठी कितीही वेळ वाट बघायची या व्यक्तींची तयारी असते. दोन्ही विरोधाभास असणाऱ्या गोष्टी या लोकांना खास बनवतात.
- या व्यक्ती नैसर्गिक आणि सुंदर गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात. आरामदायी आणि इमानदार या दोन शब्दांचा अर्थ या व्यक्तींकडे बघून लक्षात येतो.
- या राशीच्या अधिकांश व्यक्ती या अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात आणि या व्यक्तींसाठी समोरची व्यक्ती तितकीच आकर्षक असणंही महत्त्वाचं असतं
- यांचा स्वभाव कठोर असून बऱ्याचदा दुसऱ्यांना या व्यक्ती कमी समजतात. पण या व्यक्ती मनाने अत्यंत चांगल्या असतात, याबाबत कोणतीही शंका नाही
- या व्यक्तींना कोणतीही गोष्ट आवडली नाही तर त्या गोष्टीबाबत आपली नाराजी या व्यक्ती व्यक्त करतात आणि स्पष्टपणे सांगतात.
- आरामदायी आणि आपल्या मस्तीत जगणारे हे दोन शब्द यांचे वैशिष्ट्य आहे. दुसऱ्यांवर हुकूमत गाजवायला या व्यक्तींना खूपच आवडते. त्यामुळे कोणाच्याही हाताखाली काम करताना या व्यक्तींना अजिबात आनंद मिळत नाही.
- जोडीदार म्हणून वृषभ राशीच्या व्यक्ती अत्यंत विश्वासार्ह आणि चांगल्या असतात. या व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर पूर्ण अधिकार असावा असं या व्यक्तींना वाटतं. प्रेमाने या व्यक्तींकडून काहीही करून घेणं शक्य आहे. यांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करून घेणं हे अशक्य आहे. या व्यक्तींची इच्छा असेल तरच त्या प्रेमाने काम करतात.
- फॅशनच्या बाबतीत या व्यक्तींचा हात कोणी धरू शकत नाही. गर्दीतूनही या व्यक्ती आपले व्यक्तीमत्व वेगळे दर्शवतात. इतरांपेक्षा वेगळं दिसणारा असा आऊटफिट नेहमीच या व्यक्ती घालतात. घरामध्ये कसेही राहिले तरीही बाहेर मात्र नेहमीच अप्रतिम दिसायचा यांचा प्रयत्न असतो.
- परफेक्ट मॅचबद्दल बोलायचे झाले तर वृषभ आणि वृश्चिक या व्यक्तींचे खूपच जमते. यांचे नाते अत्यंत मजबूत आणि अप्रतिम ठरते. दोघांचाही स्वभाव विरोधाभासाचा असला तरीही संसारासाठी हे उत्तम आहेत. कारण एक आगीप्रमाणे आहे तर एक पाण्याप्रमाणे. ही जोडी उत्तम मानली जाते.
(Source : विविध माध्यमे/ सामाजिक गृहीतके/ ज्योतिषी/ पंचांग/ प्रवचन/ धार्मिक श्रद्धा-शास्त्रातील संकलित माहिती)