(मुंबई)
कोकणातील आंगणेवाडीची जत्रा सर्वात मोठी व प्रसिद्ध मानली जाते. या जत्रेसाठी मुंबईहून अनेक भाविक कोकणात येतात. तसेच शिमगा सणही कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यादरम्यान कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्याही सोडल्या जातात. यंदाही कोकण रेल्वेने आंगणेवाडीच्या जत्रेसाठी खास गाडीची व्यवस्था केली आहे.
पुढील महिन्यात ४ तारखेला होणाऱ्या मालवण येथील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आणि होळी सणाकरिता कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या साहाय्याने या मार्गावर एक आठवडा विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर गाडी मध्यरेल्वेच्या सहकार्याने या मार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train no. 01453
Lokmanya Tilak (T) – Surathkal – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01453 Lokmanya Tilak (T) – Surathkal Special (Weekly)
ही गाडी दिनांक 03/02/2023 ते 31/03/2023 या दरम्यान दर शुक्रवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री 22:15 वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी 15:30 वाजता सुरतकल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01454
Surathkal – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly)
ही गाडी दिनांक 04/02/2023 ते 01/04/2023 या दरम्यान दर शनिवारी ही गाडी सुरतकल या स्थानकावरुन संध्याकाळी 19:40 वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी 14:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, कारवार, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की
डब्यांची रचना
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 17 डबे आहेत.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी किंवा NTES अँप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन कोंकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.